महाराष्ट्र शासनाने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचलेली आहेत. ज्या महिलांचे मानधन तांत्रिक अडचणींमुळे रखडले होते किंवा ज्यांनी नुकतीच आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केलेली आहे, अशा महिलांसाठी गावानुसार नवीन लाभार्थी यादी प्रसिद्ध करण्यात आलेली आहेत.
या योजनेचा मुख्य उद्देश राज्यातील महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा निश्चित करण्यात आले आहे. पात्र महिलांना दरमहा १,५०० रुपये थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.
थकीत हप्त्यांसह मिळणार मोठी जाहीर
विशेष म्हणजे, ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया उशिरा पूर्ण केलेली आहेत, त्यांना मागील ३-४ महिन्यांचे थकीत हप्ते एकत्रितपणे देण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे. यामुळे अनेक महिलांच्या खात्यात ४,५०० ते ६,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कम जमा होणार आहे.
नवीन यादीत नाव कसे तपासायचे?
तुमचे नाव नवीन यादीत समाविष्ट आहे की नाही, हे पाहण्यासाठी तुम्ही खालील पर्यायांचा वापर करू शकता:
१. नारीशक्ती दूत ॲप: आपल्या मोबाईलमधील अधिकृत ॲपवर लॉगिन करून ‘अर्ज स्थिती’ (Application Status) तपासायचे आहे. २. अधिकृत पोर्टल: योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन आपला आधार क्रमांक किंवा नोंदणी क्रमांक टाकून यादी पाहता येईल. ३. स्थानिक कार्यालय: आपल्या गावातील अंगणवाडी केंद्र, ग्रामपंचायत किंवा नगरपालिका कार्यालयात प्रसिद्ध करण्यात आलेल्या गावानुसार यादीत आपले नाव पाहू शकतात.
पैसे जमा न होण्याची प्रमुख कारणे काय आहेत
अनेक महिलांचे अर्ज मंजूर असूनही त्यांच्या खात्यात पैसे जमा होत नाही. याची काही तांत्रिक कारणे खालीलप्रमाणे असू शकता.
- ई-केवायसी प्रलंबित असणे: आधार प्रमाणीकरण पूर्ण नसल्यास पैसे जमा होत नाहीत.
- बँक खाते आधारशी लिंक नसणे: तुमचे बँक खाते ‘डीबीटी’ (DBT) साठी सक्रिय असणे आवश्यक आहे.
- बँक खात्यात तांत्रिक त्रुटी: चुकीचा खाते क्रमांक किंवा आयएफएससी (IFSC) कोड यामुळे व्यवहार अयशस्वी होऊ शकतात.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजना’ राज्यातील महिलांना सन्मानाने जगण्यासाठी एक भक्कम आधार देत आहेत. जर तुमचे नाव अद्याप नवीन यादीत आले नसेल, तर तुमची ई-केवायसी प्रक्रिया त्वरित पूर्ण करा आणि बँक खाते आधारशी जोडून घ्या. यामुळे तुम्हाला थकीत रकमेसह सर्व आगामी हप्ते वेळेवर मिळण्यास मदत होणार आहे.