लाडकी बहीण योजना: गावानुसार लाभार्थी यादी जाहीर! घरबसल्या मोबाईलवर करा चेक

महाराष्ट्र राज्य सरकारने महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी सुरू केलेली ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सध्या संपूर्ण राज्यभरात खूप महत्त्वाची ठरत आहे. या योजनेअंतर्गत पात्र महिलांना प्रत्येक महिन्याला आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात पंधराशे रुपये जमा केली जाते. अनेक महिलांना आतापर्यंत किती हप्ते मिळालेले होते आणि आपले नाव नवीन यादीत आहेत का, हे तपासण्यात मोठ्या प्रमाणावर अडचणी येत आहेत.

या लेखामध्ये आपण लाडकी बहीण योजनेची लाभार्थी यादी (Beneficiary List) कशी चेक करायची आणि जमा झालेली रक्कम चेक करण्यासाठी सोपी पद्धत जाणून घेणार आहोत.

लाभार्थी यादी कशी पहायची? मराठी(Step-by-Step)

तुमचे नाव योजनेच्या अधिकृत यादीत आहेत की नाही हे तपासण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करायचे आहे:

  1. अधिकृत वेबसाईट वर: सर्वप्रथम लाडकी बहीण योजनेच्या अधिकृत पोर्टलला भेट द्यावीत.
  2. लाभार्थी यादी पर्याय आहे: होमपेजवर दिलेल्या “लाभार्थी यादी” किंवा “Beneficiary List” या पर्यायावर क्लिक करावे.
  3. तपशील निवडावा: तुमचा जिल्हा, तालुका आणि गावाचे नाव निवडावा.
  4. Search/Submit: माहिती भरल्यानंतर ‘Search’ बटणावर क्लिक करावे. तुमच्या गावाची संपूर्ण यादी स्क्रीनवर दिसेल, त्यामध्ये तुमचे नाव तपासायचे.

लाडक्या बहिणींनो तुम्हाला किती पैसे मिळाले? (Check Payment History)

आतापर्यंत तुमच्या खात्यात जमा झालेली एकूण रक्कम तपासण्यासाठी तुम्ही खालीलपैकी एका पर्यायाचा वापर करू शकतात:

  • बँक पासबुक: आपल्या बँकेत जाऊन पासबुक अपडेट करायचे. तिथे “DBT” किंवा “Majhi Ladki Bahin” या नावाने आलेले व्यवहार तपासायचे आहे.
  • मोबाईल बँकिंग: जर तुम्ही बँकेचे ॲप वापरत असाल, तर ‘Transaction History’ मध्ये जाऊन आतापर्यंत जमा झालेले १५०० रुपयांचे हप्ते मोजू शकतात.
  • नारी शक्तीदूत ॲप: या अधिकृत ॲपवर लॉगिन करूनही तुम्ही तुमच्या अर्जाची स्थिती आणि मिळालेल्या लाभाची माहिती घेऊ शकतात.

नाव यादीत नसेल तर काय करावेत?

जर तुम्ही अर्ज केला असूनही तुमचे नाव लाभार्थी यादीत दिसत नसेल, तर खालील बाबी तपासा:

  • ई-केवायसी (e-KYC): तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण आहे का याची खात्री करा. ती अपूर्ण असल्यास लाभ मिळत नाहीत.
  • आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे अनिवार्य करण्यात आले आहे.
  • अर्जाची स्थिती: पोर्टलवर ‘Application Status’ तपासा. जर अर्ज ‘Disapproved’ किंवा ‘Pending’ असेल, तर त्यातील त्रुटी दूर करावी.
  • संपर्क: अधिक माहितीसाठी आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका किंवा सेतू केंद्राशी संपर्क साधावा.

निष्कर्ष काय?

लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक स्वावलंबन देणारी एक महत्त्वाची योजना आहेत. वरील सोप्या पद्धतींचा वापर करून तुम्ही घरबसल्या तुमच्या अर्जाची आणि पैशांची स्थिती तपासू शकतात. तांत्रिक अडचणी टाळण्यासाठी आपले आधार आणि बँक खाते नेहमी अपडेट ठेवणे गरजेचे आहे.

महत्त्वाची सूचना: ही माहिती केवळ मार्गदर्शनासाठी आहेत. अधिकृत आणि खात्रीशीर माहितीसाठी नेहमी सरकारी संकेतस्थळाचाच वापर करावा. कोणत्याही अनोळखी व्यक्तीला आपला OTP किंवा बँक तपशील देऊ नका. आणि माहिती शेअर करू नका.

Leave a Comment