महाराष्ट्र च्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेबाबत मार्च २०२६ मध्ये एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आणलेली आहे. ज्या महिलांना फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचे मानधन अद्याप मिळालेले नाही, त्यांच्यासाठी ही बातमी दिलासादायक आणि तितकीच आनंदाची बातमी आली आहे.
लाडकी बहीण योजनेचे ३००० रुपये या दिवशी खात्यात जमा होणार ची
फेब्रुवारी आणि मार्च २०२६ या दोन्ही महिन्यांचे हप्ते अजून जमा झाले नसल्याने अनेक भगिनी चिंतेत असल्याचे पाहायला मिळालेले आहे.शासनाकडून मिळालेल्या नवीन रिपोर्ट नुसार:
- एकत्रित हप्ता: फेब्रुवारी २०२६ आणि मार्च २०२६ या दोन्ही महिन्यांचे मिळून एकूण ३००० रुपये आजपासून महिन्यात एकत्रितपणे दिले जाणार आहेत.
- निश्चित तारीख: नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला, म्हणजेच १५ एप्रिल २०२६ च्या आत हे पैसे पात्र महिलांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.
- महत्त्वाची सूचना: आपले बँक खाते ‘Active’ ठेवणे आणि ते आधारशी लिंक असल्याची खात्री करणे आवश्यक आहे, जेणेकरून तांत्रिक अडचणी येणार नाहीत.
या महिलांचा लाभ कायमचा बंद होणार आहे.
एकडे ३००० रुपये मिळण्याची बातमी असतानाच, हजारो महिलांची नावे लाभार्थी यादीतून वगळली जाणार आहे.
- e-KYC अंतिम तारीख: ज्या महिलांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत आपली ई-केवायसी (e-KYC) प्रक्रिया पूर्ण केली नाही, त्यांचा १५०० रुपयांचा दरमहा लाभ कायमचा बंद केला केला जाणार आहे.
- पडताळणी प्रक्रिया: १० एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ दरम्यान अर्जांची कडक पडताळणी होणार असून, ज्यांनी केवायसी केलेले नाही किंवा ज्यांच्या अर्जात त्रुटी आहेत, त्यांना यादीतून वगळले जाणार आहे.
अपात्रतेचे महत्त्वाचे निकष (Check List)
तुमचा लाभ सुरू राहावा असे वाटत असेल, तर खालील निकष तपासा. या निकषांत बसणाऱ्या महिलांना योजनेतून अपात्र ठरवले जाणार आहे.
- उत्पन्न मर्यादा: कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा जास्त असल्यास.
- वयोमर्यादा: लाभार्थी महिलेचे वय २१ वर्षांपेक्षा कमी किंवा ६५ वर्षांपेक्षा जास्त असल्यास.
- इतर सरकारी लाभ: केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर कोणत्याही वैयक्तिक लाभाच्या योजनेचा फायदा घेत असल्यास.
- कुटुंबातील लाभार्थी: एकाच कुटुंबात दोनपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्यास (केवळ दोनच महिलांना लाभ मिळतो).
- वाहने: ज्या कुटुंबात चारचाकी वाहन (ट्रॅक्टर सोडून) आहे, त्या कुटुंबातील महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाहीत.
निष्कर्ष
लाडकी बहीण योजनेचा ३००० रुपयांचा एकत्रित हप्ता मिळवण्यासाठी तुमची ई-केवायसी प्रक्रिया ३१ मार्च २०२६ पूर्वी पूर्ण असल्याची खात्री करायला पाहिजे. एप्रिलच्या मध्यापर्यंत पात्र भगिनींच्या खात्यात हा निधी जमा होण्यास सुरुवात होणार आहे.