लाडकी बहीण योजना कोट्यवधी महिलांसाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आलेली आहे आहे. ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या जानेवारी २०२६ च्या हप्त्याबाबत राज्य सरकारने अधिकृत शासन निर्णय (GR) जाहीर करण्यात आला आहे. यामुळे गेल्या काही दिवसांपासून हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या महिलांचा मार्ग मोकळा झाला असून, थेट लाभ हस्तांतरणाची (DBT) प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे.
या निर्णयामुळे पात्र महिलांच्या बँक खात्यात आता लवकरच १५०० रुपये जमा करण्यात येणार आहेत.
नव्या शासन निर्णयामध्ये (GR) काय तरतूद आहे?
राज्य सरकारने आज रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार, जानेवारी फेब्रुवारी मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी सुमारे ९८.४५ कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मंजुरी दिली आहे. वित्त विभागाने या निधीला हिरवा कंदील दिल्यामुळे तांत्रिक अडथळे दूर झाले असून निधी वितरणाचा मार्ग प्रशस्त झाला आहे.
बँक खात्यात पैसे कधी जमा होणार?
शासन निर्णय जाहीर झाल्यानंतर साधारणपणे ४ ते ५ कामकाजाच्या दिवसांत रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात पोहोचण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.
- अपेक्षित तारीख: आज पासून अनेक जिल्ह्यांमध्ये निधी वितरणास सुरुवात झाली असून, सर्व पात्र महिलांना हा लाभ मिळण्याची सुरुवात झालेली आहे.
- वितरण पद्धत: ही रक्कम थेट ‘DBT’ प्रणालीद्वारे जमा केली जाणार असल्याने यामध्ये कोणत्याही मध्यस्थाची गरज नाहीत.
‘या’ महिलांना योजनेचा हप्ता मिळणार नाही
सरकारी निधीचा योग्य वापर व्हावा आणि पारदर्शकता टिकून राहावी यासाठी सरकारने काही नियम पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे. खालील दोन योजनांचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता दिला जाणार नाही:
१. संजय गांधी निराधार योजना: या योजनेतून आधीच दरमहा अर्थसहाय्य घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण योजनेचा अतिरिक्त लाभ मिळणार नाहीत. २. श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तिवेतन योजना: या योजनेच्या लाभार्थ्यांनाही ‘दुहेरी लाभ’ प्रतिबंध नियमानुसार या योजनेतून वगळण्यात आले आहेत.
महत्त्वाची टीप: शासनाच्या धोरणानुसार, एकाच व्यक्तीला दोन वेगवेगळ्या सरकारी अर्थसहाय्य योजनांचा लाभ घेता येत नाहीत.
हप्ता मिळवण्यासाठी ‘या’ ३ गोष्टींची खात्री करा करावी
जर तुम्हाला अद्याप हप्त्याचा मेसेज आला नसेल, तर त्वरित खालील बाबी तपासायचे आहे:
- आधार लिंकिंग: तुमचे बँक खाते आधार कार्डशी जोडलेले (Aadhar Seeded) असणे अनिवार्य आहे, तरच ‘DBT’ द्वारे पैसे जमा होणार आहे.
- e-KYC प्रक्रिया: तुमची ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असल्याची खात्री महाडीबीटी पोर्टलवर करायचे आहे.
- SMS अलर्ट: बँकेचा मोबाईल मेसेज अलर्ट सुरू ठेवा, जेणेकरून रक्कम जमा होताच तुम्हाला त्याची माहिती मिळेल.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही महिलांच्या स्वावलंबनासाठी अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. जानेवारीचा हप्ता आता वितरणाच्या अंतिम टप्प्यात आहेत. जर काही तांत्रिक कारणास्तव पैसे अडकले असतील, तर आपल्या जवळच्या सेतू केंद्राशी किंवा जिल्हा महिला व बालविकास कार्यालयाशी संपर्क साधावा.