Ladaki Bahin Yojana KYC Process : राज्यभरातील लाखो महिलांसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असलेल्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ च्या फेब्रुवारी महिन्याच्या हप्त्याची प्रतीक्षा आता पूर्णपणे संपलेली आहे. जानेवारीचा हप्ता काही ठिकाणी उशिरा मिळाल्याने महिलांमध्ये चिंतेचे वातावरण पाहायला मिळालेले होते, मात्र आता फेब्रुवारीच्या हप्त विषयी मोठी बातमी नुकतीच समोर आली आहे.
फेब्रुवारी हप्ता: पंधराशे रुपये महिलांना कधी मिळणार?
प्रसिद्ध मीडिया रिपोर्ट मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सरकार फेब्रुवारी महिन्याचा हप्ता ८ मार्च २०२६ रोजी म्हणजे ‘आंतरराष्ट्रीय महिला दिना’ चे औचित्य साधून पैसे लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात येत आहे.
- अर्थसंकल्पाचा परिणाम: ६ मार्च रोजी राज्य सरकार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यामध्ये या योजनेसाठी अधिक निधीची तरतूद करण्यात येणार असून, त्यानंतर लगेचच हप्ते जमा करण्यास सुरुवात केली जाणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे
- वितरण प्रक्रिया: ‘येत्या ४ ते ५ दिवसांत’ महिलांच्या खात्यात पैसे येतील, अशी चर्चा सर्व प्रसारमाध्यम तसेच न्यूज मीडिया रिपोर्ट मध्ये पसरलेली आहे
कोणाला मिळणार लाभ? केवायसी केली नसल्यास पैसे मिळणार नाहीत
ज्या भगिनींना अद्याप फेब्रुवारीचा हप्ता मिळालेला नाही, त्यांनी खालील तांत्रिक बाबी तपासाव्यात:
- ई-केवायसी (e-KYC): लाखो महिलांचे हप्ते फक्त केवायसी अपूर्ण असल्यामुळे रखडले आहेत. जर तुमचे केवायसी पूर्ण केलेली नसेल, तर त्वरित बँकेत किंवा पोर्टलवर जाऊन ते पूर्ण करावीत.
- आधार लिंकिंग आवश्यक: तुमचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि DBT (Direct Benefit Transfer) सक्रिय असणे आवश्यक आहेत.
- एकत्रित हप्ते सहा हजार रुपये: ज्या महिलांनी केवायसी उशिरा पूर्ण केलेली आहे, त्यांना त्यांचे रखडलेले सर्व हप्ते एकत्रितपणे दिले जाणार आहे, असे सरकारने स्पष्ट केलेले आहेत.
तुमचे पैसे खात्यात आले का? असे तपासा (Check Status)
हप्ता जमा झाला आहे की नाहीत हे पाहण्यासाठी केवळ मेसेजची वाट न पाहता खालील पद्धतींचा अवलंब करावा:
- मोबाईल बँकिंग/ॲप: तुमच्या बँकेच्या अधिकृत ॲपद्वारे व्यवहार तपासू शकतात.
- नारी शक्तीदूत ॲप: या ॲपवर लॉगिन करून आपल्या अर्जाची स्थिती (Application Status) पाहू शकतात.
- एटीएम/पासबुक: जवळच्या एटीएममधून मिनी स्टेटमेंट काढा किंवा बँकेत जाऊन पासबुक अपडेट करणे गरजेचे आहे.
लाडक्या बहिणींना योजनेचा मोठा आधार
महाराष्ट्र सरकारचे ‘लाडकी बहीण योजना’ ही केवळ आर्थिक मदत नसून महिलांना आत्मनिर्भर बनवणारा एक अत्यंत महत्त्वाची योजना आहे. दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील महिलांना त्यांच्या दैनंदिन गरजा, मुलांचे शिक्षण आणि आरोग्यासाठी कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही अशी नवी योजना राज्य सरकारच्या माध्यमातून राबविण्यात सुरुवात करण्यात आलेली होती.
निष्कर्ष काय?
राज्यातील सर्व लाडकी बहीण योजनेच्या पात्र महिलांना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार असून महिलांनी आपल्या स्तरावर केवायसी पूर्ण असल्याची खात्री करावीत. अधिकृत घोषणा होईपर्यंत अफवांवर विश्वास ठेवू नका आणि योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावीत.
डिस्क्लेमर: ही माहिती राज्यामधील उपलब्ध बातम्या आणि नवीन प्रसिद्ध सूत्रांवर आधारित आहे. अधिकृत तारखेसाठी सरकारकडून येणाऱ्या निवेदनाची प्रतीक्षा करावीत.