Gharkul Yojana List 2026: जिवनभरात प्रत्येक सामान्य माणसाचे स्वतःच्या हक्काचे घर असावेत हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमार्फत प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) राबविण्यात येत आहे. २०२६ च्या नवीन आर्थिक वर्षासाठी सरकारने घरकुल योजनेची अद्ययावत लाभार्थी यादी प्रसिद्ध केलेली आहेत. जर तुम्ही घरासाठी अर्ज केला असेल, तर तुम्ही घरबसल्या मोबाईलवर तुमचे नाव अगदी घरबसल्या चेक करू शकता.
प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) संपूर्ण माहिती
या योजनेअंतर्गत ग्रामीण आणि शहरी भागातील आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना घर बांधण्यासाठी थेट आर्थिक मदत जाहीर केली आहे.
- अनुदान रक्कम: ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना ₹१,२०,००० पर्यंत अनुदान मिळणार आहे, तर दुर्गम भागासाठी ही रक्कम ₹१,३०,००० आहेत.
- अतिरिक्त लाभ: मनरेगाअंतर्गत मजुरी आणि शौचालय बांधण्यासाठी स्वतंत्र निधी दिला जातो.
- पारदर्शकता: योजनेचा पैसा थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा होतो.
घरकुल यादीत नाव कसे तपासायचे? (Step-by-Step)
तुमच्या गावची नवीन यादी पाहण्यासाठी खालील सोप्या स्टेप्स फॉलो करा:
१. अधिकृत वेबसाइट: सर्वप्रथम pmayg.nic.in या पोर्टलला भेट द्यावी लागते. २. Awaassoft पर्याय: होम पेजवर असलेल्या ‘Awaassoft’ या टॅबवर क्लिक करायचे आहे आणि त्यानंतर ‘Report’ हा पर्याय निवडायचा असतो. ३. Social Audit Report: नवीन पेजवर सर्वात खाली ‘H. Social Audit Reports’ या विभागात जा आणि ‘Beneficiary Details For Verification’ वर क्लिक करावे. ४. फिल्टर निवडा: आता तुमचे राज्य (Maharashtra), जिल्हा, तालुका आणि तुमचे गाव निवडावी लागते. वर्ष निवडीमध्ये ‘2025-26’ सिलेक्ट करा. ५. योजना: ‘Select Scheme’ मध्ये ‘Pradhan Mantri Awaas Yojana Gramin’ निवडावी. ६. कॅप्चा कोड: विचारलेल्या गणिताचे अचूक उत्तर देऊन ‘Submit’ बटणावर क्लिक करायचे आहे.
यानंतर तुमच्या गावाची संपूर्ण यादी PDF स्वरूपात दिसेल, ज्यामध्ये तुम्ही तुमचे नाव शोधू शकतात.
निधी वितरणाचे चार टप्पे (Installments)
घरकुलाचा निधी थेट बँक खात्यात खालीलप्रमाणे जमा होतो:
- पहिला हप्ता (₹१५,०००): घर मंजूर झाल्यावर पाया खोदण्यापूर्वी.
- दुसरा हप्ता (₹४५,०००): जोते (Plinth Level) पूर्ण झाल्यावर.
- तिसरा हप्ता (₹४०,०००): लिंटल लेव्हल (दारे-खिडक्यांच्या वरची पातळी) पूर्ण झाल्यावर.
- चौथा हप्ता (₹२०,०००): घर पूर्ण होऊन प्लास्टर व अंतिम फोटो अपलोड केल्यावर.