Ladaki Bahin Yojana KYC Date 2026: महाराष्ट्र सरकारच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या लाभार्थी महिलांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी नुकतीच पुढे आलेली आहे. आता केवळ दरमहा १५०० रुपयेच नाही, तर स्वतःचा छोटा व्यवसाय सुरू करण्यासाठी महिलांना १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्याचा ऐतिहासिक निर्णय राज्य शासनाने नुकताच जाहीर केलेला आहे. या योजनेमुळे राज्यातील महिला केवळ लाभार्थी न राहता ‘उद्योजक’ बनण्याच्या दिशेने पाऊल टाकणार आहे.
लाडक्या बहिणींना थेट १ लाख रुपये मिळणार
लाडकी बहीण योजना या कर्ज सुविधेचा मुख्य उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे. याची काही प्रमुख वैशिष्ट्ये खालीलप्रमाणे आहेत:
- कर्जाची रक्कम: लघु उद्योग किंवा व्यवसायासाठी १ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज थेट महिलांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येईल.
- परतफेडीची सोपी पद्धत: या कर्जाच्या हप्त्याची परतफेड महिलांना दरमहा मिळणाऱ्या १५०० रुपयांच्या मानधनातूनच केली जाणार असल्याची माहिती नुकतीच देण्यात आली आहे.
- विनासायास कर्ज: हप्ता थेट लाडकी बहीण योजनेच्या पैशातून कापला जाणार असल्याने महिलांना खिशातून वेगळे पैसे भरण्याची किंवा आर्थिक ओढाताण करण्याची गरज भासणार नसल्याने महिलांना याचा प्रत्यक्ष लाभ मिळणार आहे.
कर्ज सुविधेसाठी आवश्यक पात्रता आणि अटी काय आहेत?
या सुविधेचा लाभ घेण्यासाठी महिलांनी खालील अटी पूर्ण करणे आवश्यक आहेत:
- पात्र लाभार्थी: महिला ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेची अधिकृत आणि पात्र लाभार्थी असावीत.
- नियमित हप्ते: ज्या महिलांना योजनेचे नियमित मासिक हप्ते मिळत आहेत, त्यांनाच या कर्जासाठी प्राधान्य दिले जाणार आहे.
- e-KYC आणि आधार: संबंधित महिलेचे बँक खाते आधार कार्डशी लिंक असणे आणि e-KYC प्रक्रिया पूर्ण असणे अनिवार्य करण्यात आलेले आहे.
महिलांना व्यवसायाची मोठी संधी उपलब्ध झाली
या १ लाख रुपयांच्या भांडवलातून महिला विविध छोटे व्यवसाय सुरू करू शकतात:
- शिवणकाम आणि टेलरिंग युनिट.उपलब्ध झाली
- ब्युटी पार्लर किंवा घरगुती मेस.
- खाद्यपदार्थ निर्मिती (पापड, लोणचे इ.) व्यवसाय.
- छोटा किरणा स्टोअर किंवा हस्तकला व्यवसाय.
बँक स्तरावर या प्रक्रियेची तयारी सुरू असून लवकरच अधिकृत पोर्टल किंवा अर्जाची सविस्तर प्रक्रिया जाहीर केली जाणार आहेत. एकदा कर्जाची पूर्ण परतफेड झाली की, १५०० रुपयांचा हप्ता पुन्हा महिलांच्या खात्यात पूर्णपणे जमा होण्यास सुरुवात होणार आहेत.
निष्कर्ष काय?
लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकार महिलांना केवळ आर्थिक मदतच करत तर महिलांना प्रत्यक्ष सहाय्य करण्यात येत आहेत त्यामुळे याचा फायदा महिलांना खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तर त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी हक्काचे भांडवलही पुरवत आहे. ही योजना ग्रामीण आणि शहरी दोन्ही भागातील महिलांच्या आयुष्यात मोठे परिवर्तन घडवून आणू शकतेय.
अस्वीकरण (Disclaimer): ही माहिती उपलब्ध बातम्या आणि अधिकृत स्त्रोतांवर आधारित आहेत. अधिकृत शासन निर्णय (GR) आणि अर्जाच्या प्रक्रियेतील बदलांसाठी वेळोवेळी सरकारी पोर्टलची पडताळणी करावीत.